“महिला बचतगटांचा ग्रामीण बँकेवर मोर्चा”

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी 👉महादेव गिरी

अनेक वेळा प्रस्ताव सादर करुनही महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वालुर यांच्या वतीने कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना कर्ज देण्यास टाळाटाळ होत होती. यामुळे बुधवारी दुपारी भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष वनिताताई चाफेकर यांच्या नेतृत्वाखाली बचतगटांच्या शेकडो महिलांचा वालुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतधडक मोर्चा काढला होता.यावेळी शाखा व्यवस्थापक सत्येंद्र चौधरी यांनी महिलांच्या तक्रारी जाणुन घेऊन चर्चा केली.
तक्रारींचे लेखी स्वरुपात निवेदन स्विकारले.यापुढे सर्व महिला बचतगटांचे आलेले प्रस्ताव पारीत करून बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन व्यवस्थापक चौधरी यांनी दिले. शाखा व्यवस्थापक सत्येंद्र चौधरी यांनी आश्वासन दिल्या नंतर महिलांचा मोर्चा स्थगित करण्यात आला. निवेदनावर माया कुपनवार,उजवला कलाल,कविता सुजनवार, मनिषा गिरी,सखुबाई पाथरकर,संगिता धाबे,सुनिता मसुरे,अयोध्या रोकडे,राधा टेकाळे,सविता खरबे,मनिषा वावरे,सविता चंदनवार,मिना वाटुरे,मिना भालेराव यांच्यासह शेकडो महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here