लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी महादेव गिरी

वालुर येथे दि.24 आँगष्ट मंगळवार रोजी परभणी येथे शासकीय महाविद्यालयास मंजुरी मिळावी यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी मिळावी यासाठी सर्व पक्षीय स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी वालुरचे ग्रामदैवत
वाल्मिकेश्वर भगवान यांच्या मंदिरात पुजा करून श्रीफळ फोडून स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी शैलेश तोष्णीवाल, देशमाने सर, राहुल खपले ,राजेश साडेगावकर आदिंनी परभणी येथे शासकीय महाविद्यालय झाल्यास परभणी जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा कशा पद्धतीने लाभ होईल या संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार रहेमान पठाण यांनी मानले. याप्रसंगी बहुसंख्येने वालुर येथील व्यापारी ,प्रतिष्ठित नागरिक ,शिक्षक कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, खाजगी वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी आदिंनी उपस्थित राहुन स्वाक्षरी मोहिमेस प्रतिसाद दिला.
या मोहिमेसाठी शैलेश तोष्णीवाल,बाजीराव बोडखे, गणेश मुंढे, शेषेराव वाघमोडे, पांडुरंग रोकडे, विजु बापु रेवणवार, संतोष सोनवणे,अंजाराम सोनवणे , गोपाळ आबुज, रामभाऊ धापसे,गोपाळ थोरात,ईरफान जमिनदार व ईतर क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here