वणी खुर्द येथे आमदार सुभाष धोटे यांची भेट : स्थानिक गावकऱ्यांची काढली समजूत.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


जिवती :– चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या तालुक्यात दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हात पाय बांधून जबर मारहाण केली. या घटना स्थळी आमदार सुभाष धोटे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. गवातील ज्येष्ठ मंडळींना घेऊन समजूत काळली आणि कायदा हातात घेऊ नये गवाची प्रतिष्ठा घालवचे कमा करू नये, माणवता धर्म आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे असे आवाहन केले. चुकीच्या गोष्टीला आमचा कधीच पाठिंबा नाही सर्व गुण्या गोविंदाने रहावे असे सांगीतले. गावातील परिस्थिती सध्या शांत आहे. पोलीस बंदोबस्त तैनात असलेल्या पोलीसांकडून गावातील परिस्थितीचा आडवा घेण्यात आला. गावातील नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी जिवती प.स. चे माजी उपसभापती सुग्रीव गोतावळे, माजी उपनराध्यक्ष अशफाक शेख, सरपंच पुंडलिक गिरमाजी, उपसरपंच हनमंतू देवकते, कैलाश कुंडगिर, गुणवंत कांबळे, परमेश्वर कांबळे, पत्रकार कंटू कोटनाके, शंकर चव्हाण यासह अनेकांची उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here