माजी सभापती आबाजी पाटील ढुमने यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा.

लोकदर्शन 👉मोहन भारती


३२ रक्तदात्यांचे रक्तदान तर १६ लाभार्थ्यांना एच पी गॅसचे वितरण.

राजुरा (ता.प्र) :– राजुरा काँग्रेस चे ज्येष्ठ व निष्ठवांत नेते, कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा चे माजी सभापती आबाजी पाटील ढुमने यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधी येथे सकाळी ११ वाजता पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ते सिंधी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा रोजगार हमी योजना राजुरा चे माजी अध्यक्ष राहीले आहेत तर आदीवासी विविध सहकारी संस्था चींचोली बु. चे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. शांत, संयमी आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त सिंधी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी सिंधी येथे भव्य रक्तदान शिबीर, ग्रंथालय व अभ्यासीका उद्घाटन समारंभ, वृक्षारोपण, HP गॅस सिलिंडर वाटप, कोरोना योध्दांचा सत्कार असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या प्रसंगी एकूण ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. १६ लाभार्थींना एच पी गॅस चे वितरण करण्यात आले तर विविध जातीच्या ३० झाडांची लागवड करण्यात आली.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी सभापती तथा प स सदस्य कुंदा जेणेकर, तुकाराम मानुसमारे, विकास देवाडकर, जावेद अब्दुल, सिंधी चे सरपंच शोभा रायपल्ले, उपसरपंच रामभाऊ आबाजी ढुमने, विहिरगावचे सरपंच रामभाऊ देवईकर, ईरशाद शेख, राजु दामेलवार, मंगेश रायपल्ले यासह अनेक मान्यवर आणि गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here