व्याघ्र दिना निमित्त वन्यप्रेमीचे निदर्शन आंदोलन*

By : Mohan Bharti 

*गळफास लागलेल्या वाघिणीला तत्काळ उपचाराकरिता जेरबंद करा मागणी. 


गडचांदुर – व्याघ्र दिन निमित्त गडचांदुर येथील पर्यावरण प्रेमी व वि कॅन फौंउडेशन वतीने वरोरा परिसरातील सध्या चर्चेत असलेल्या , गळफास लागलेली वाघीण कॅमेरात कैद झाल्यानंतर तिच्या बचावा करिता 2 महिन्या पासून शोधमोहीम सुरू आहे , गळफास लागलेल्या वाघिनीला तत्काळ जेरबंद करण्याची गरज असताना , दोन महिने लोटूनही वाघिणीला जेरबंद करण्यास अपयशी ठरले आहे , वाघिणीला उपचाराकरिता जेरबंद करणार कधी ? अशे प्रश्न उपस्थित केले जात आहे , व्याघ्र दिना निमित्त पर्यावरणप्रेमी व वि कॅन फौंडेशन वतीने , वाघिणीला तत्काळ जेरबंद करण्याकरिता लक्षवेधी निदर्शने केले , सेव्ह वरोरा टायग्रेस अशा घोषणा देण्यात आल्या ,व वाघिणीला उपचारा करिता तात्काळ जेरबंद करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे .
याप्रसंगी वी कॅन फौंडेशन चे अध्यक्ष प्रितेश मत्ते ,इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *