अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी व नागरीकांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. — रंजन लांडे.

By : Mohan bharti

राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

राजुरा : दिनांक २२ जुलै व २३ जुलै २०२१ रोजी राजुरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील कापूस, सोयाबीन, तूर, धान असे अनेक शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अनेक नागरिकांच्या राहत्या घरात पावसाचे पाणी जाऊन घरातील जीवनावश्यक वस्तूची नासधूस झाली. अनेक ठिकाणी राहती घरे कोसळलील, जनावरांना क्षति पोहचली, त्यांचा चारा सुद्धा खराब झाला. वेकोलीच्या कोळसा खाणीच्या मातीच्या ढिगार्यामुळे तसेच नाले प्रभावीत झाल्यामुळे परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचले व मोठी हानी झाली.
तेव्हा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व खरीप शेतीचे तातडीने पिकांचे पंचनामे करून एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या निकषावर शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. आधीच शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पिकाची लागवड केली होती. पिकेही चांगली होती. परंतु, निसर्गाने शेतकऱ्यांना पुन्हा चिंतेच्या आणि कर्जाच्या खाईत लोटले आहे. तसेच अनेकांच्या घरांचे, जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. जनावरे पुरा मध्ये वाहून गेले. अशा स्थितीत सरकारने तातडीने पंचनामे करून नुक्संग्रस्ताना तात्काळ मदत करावी. तसेच पुरामुळे रस्ते, छोटे पूल क्षतिग्रस्त झालेत त्यांची तातडीने दुरस्ती करण्यात यावी. अशी मागणी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी राजुराचे तहसिलदार हरीश गाडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भातील एक निवेदन तालुका कृषी अधिकारी राजुरा यांनाही देण्यात आले.
या प्रसंगी राजुरा तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळात नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरणुले , प.स. सदस्य कुंदाताई जेणेकर, तुकाराम मानुसमारे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेविका संध्या चांदेकर, हरिचंद्र जुनघरी, शिवराम लांडे, अविनाश जेनेकर, रामभाऊ ढुमने, कवडू सातपुते, विकास देवाडकर, अमोल घटे, इर्शाद शेख, धनराज चिंचोलकर, संदीप घोटेकर, आकाश गीरी, प्रमोद बोढे, मधू सोयाम, मारोती बोढेकर, शंकर आत्राम, मंगेश रायपल्ले विनोद ढुमने राजु दामेलवार, प्रदीप भिवनकर, गणेश चौधरी, यासह कांग्रेसचे विविध विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *