मोठी बातमी! राज्यात १५ जुलैपासून होणार शाळा सुरू

By : Mohan Bharti

हिंगोली: आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार असून यासाठी गावाने जबाबदारी स्वीकारावी, अशी माहिती पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी शुक्रवारी ता. नऊ हिंगोली येथे दिली. पालकमंत्री गायकवाड हिंगोली जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांचे हिंगोलीत आगमन झाले यावेळी त्यांना शाळा सुरू करण्याच्या संबंधित माहिती विचारली असता त्या म्हणाल्या की, गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली एक समिती या संदर्भात निर्णय घेणार आहे.

मागील महिनाभरापासून एकही रुग्ण न आढळलेल्या ठिकाणी वर्ग सुरू केले जाणार आहेत. शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करावे विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात मनाई करण्यात आली आहे. शाळा सुरू करताना मुलांना टप्याटप्यात शाळेत बोलविण्यात यावे त्यासाठी वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी, दुपारी नियोजनानुसार वर्ग सुरू करावे एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा. यासह इतर विविध उपायोजना करण्याच्या मार्गदर्शक सुचनाही शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार असून ही समिती शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार आहे.

या समितीत अध्यक्ष सरपंच राहणार असून सदस्य म्हणून तलाठी शाळा समितीचे अध्यक्ष, वैद्यकिय अधिकारी, मुख्याध्यापक केंद्र प्रमुख तर ग्रामसेवक हे सदस्य सचिव राहणार आहेत. वर्ग सुरू करण्याबाबत किती ठिकाणावरून ठराव येतात यावरून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेचा विचार करुनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचे पालकमंत्री गायकवाड यांनी सांगितले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *