डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी सत्तर वर्षापूर्वी 370 हटवा म्हणणारे लोकनेते यांना आदरांजली


लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने आज दि 23:6:2021 रोज बुधवार ला सकाळी 9:00 वाजता भाजप कार्यालय कोरपणा येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष होते,सत्कारमूर्ती कृष्णाजी पडोळे सर सेवा निवृत्त शिक्षक प्रमुख पाहुणे लाभलेले अमोलजी आसेकर नगरसेवक कोरपना, ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव,एड पवन मोहितकर,सुनील देरकर,दिनेश जी खडसे युवा मोर्चा कार्यकर्ते,पद्माकर दगडी भाजप कार्यकर्ते गजाननजी पत्रीवार आदी मान्यवर उपस्थित होते कृष्णाजी पडोळे सर सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार एड पवनजी मोहितकर यांच्या हस्ते डॉ केएर मशीन, कोविडकिट,डॉ शामाप्रसाद मुखर्जी यांचा फोटो,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म 1901 रोजी कलकत्ता येथे झाला ते बंगाली समाजाचे होते व त्यांनी जनसंघाची स्थापना केली त्या मधूनच भारतीय जनता पार्टी उदयाला आली डॉ शामा प्रसाद मुखर्जी राजकारणातील हिंदुत्व व हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे प्रवर्तक होते सुरुवातीपासूनच जम्मू काश्मीर येथील 370 कलम हटविण्यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले व त्याची सजा म्हणून त्यांना 11 मे 1953 रोजी डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांना अटक झाली आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले तेथेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला त्या मृत्यूची चौकशी आज पर्यंत झाली नाही ते महान देशभक्त होते माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी 370 कलम हटवून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी आदरांजली वाहिली असे बोलून दाखविले इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन दिनेश खडसे यांनी केला तर आभार ओम पवार यांनी मानले

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *