गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे भारतरत्न राजीव गांधी पुण्यतिथी साजरी,,

,÷÷÷÷===÷=÷=====लोकदर्शन ÷मोहन भारती
विविध कार्यक्रम चे आयोजन
गडचांदूर,,,(ता,प्र,) ब
कोरपना तालुका काँग्रेस कमिटी व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे भारताचे माजी पंतप्रधान युवकांचे प्रेरणा स्थान भारतरत्न स्व,राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली,
स्थानिक महात्मा गांधी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सविताताई टेकाम होत्या ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे यांनी केले. कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे व नगर परिषद चे गटनेते विक्रम येरणे यांनी राजीव गांधी यांच्या जीवनचारित्र्य वर प्रकाश टाकला.याप्रसंगी
उपमुख्याध्यापिका सौ,स्मिता ताई चिताडे, युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, आरोग्य सभापती राहुल उमरे, नगरसेवक पापय्या पोन्नामवार, अरविंद मेश्राम, ज्येष्ठ नेते धनंजय गोरे, आशिष वांढरे उपस्थित होते. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस कमिटी तर्फे होली फॅमिली स्कूल येथे सुरू असलेल्या कोविड सेंटर येथे उकडलेली अंडी व मास्क वितरित करण्यात आले.कार्यक्रम चे संचालन तथा
आभार प्रदर्शन तालुका युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अतुल गोरे यांनी केले.
,,फोटो,,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *