भाजपाच्या मागणीला यश बिबी येथे कोविड१९ लसीकरण केंद्र सुरू!!

0
96

दि 20/4_2021 शिवाजी सेलोकर
गडचांदूर – कोरोणाचा प्रादुर्भाव जोमात चालू असून त्यावर मात करण्याकरिता शासन,प्रशासन मोठ्या शर्तीचें काम करीत असून संपूर्ण देश्यात कोविट १९ लसीकरण केंद्र चालू केले आहे.त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यात सुद्धा कोरपना, गडचांदूर, नारंडा येथे कोवीट १९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते.परन्तु नांदा ,बीबी,आवळपुर हे मोठे गाव असून तेथील लोकांना नारंडा किव्हा गडचांदूर येथे येऊन लस घेणे फार अवघड होते.कित्येकदा लस उपलब्ध नसल्याने वापस यावे लागत होते.त्यामुळे कित्येक लोक लस घेण्यास टाळटाळ करीत होते.ही अडचण लक्षात घेता भाजपा जिल्हा सदस्य,तथा माजी पंचायत समिती कोरपना सभापती मा संजयभाऊ मुसळे व इतर यांनी मा तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कडे दिनांक १४/४/२०२१ रोजी मागणी केली असता त्याची दखल घेत आज दिनांक २०/४/२०२१ रोजी बिबी येथे कोविट १९ लसीकरण केंद्राचे उदघाटन मा डाँ. स्वप्नील टेम्भे साहेबांचे हस्ते पार पडले.यावेळी आ. सेविका मेश्राम, आ. सेवक कोडापे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. चंदनखेडे सर, व इतर कर्मचारी हजर होते.
व आज पहिल्या दिवशी 100 लोकांनी त्याचा लाभ सुद्धा घेतला बिबी येथे कोविट १९ लसीकरण केंद्र चालू झाल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.सदरचे केंद्र चालू करण्याकरिता मा संजयभाऊ मुसळे,सतिषभाऊ उपलेंचिवार,अरविंद डोहे निलेश ताजने आदीने परिश्रम घेतल्याने त्यांचे गावकऱ्यानी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here