कोरोना मुळे मृत्यू झालेल्या इसमावर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीच केले अंत्यसंस्कार

By : Mohan Bharti

गडचांदूर : शहरातील ढुमने लेआऊट मध्ये राहणाऱ्या 47 वर्षे वयाच्या पुरुषांला कोरोना ची लागण झाली,सदर व्यक्तीला लक्षणे असताना सुद्धा कोणतेही उपचार न घेता घरीच राहिला ,चाचणी केली असता कोरोना पझिटिव्ह आढळली,परंतु परिस्थिती उपचारासारखी नसल्याने घरीच मृत्यू झाला.सदर व्यक्ती चे पूर्ण अंत्यसंस्कार नगर परिषद च्या कर्मचाऱ्यांनी गडचांदूर येथे केले.तरी नागरिकांनी लक्षणे दिसताच चाचणी करून वेळीच उपचार घ्यावे स्वतःला व कुटुंबियांना पर्यायाने समाजाला सुरक्षित ठेवावे,असे आवाहन नगर परिषदेच्या मुख्यधिकारी डॉ, विशाखा शेळकी यांनी केले आहे, गडचांदूर शहरात आजच्या स्थितीत कोरोना पझिटिव्ह रुग्णांची संख्या 187 आहेत, तेव्हा प्रत्येक नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे, शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदी चे उल्लंघन करू नये, असे आवाहन प्रशासन च्या वतीने करण्यात आले आहेत.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *