महात्मा गांधी विद्यालयात डॉ ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

By : Mohan Bharti

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती स्थानिक महात्मा गांधी विद्यालय,व उच्च माध्यमिक विद्यालय येथे साजरी करण्यात आली,
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक कृष्णा बततुलवार होते,प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपमुख्याध्यापीका सौ,स्मिता चिताडे ,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षिका श्रीमती शोभा घोडे होत्या,सर्वप्रथम अतिथीनि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, याप्रसंगी वामन टेकाम, विश्वनाथ धोटे,अमृता इखारे,वनिता पेंदाम,विनोद पाटील,प्रभाकर मांडवकर उपस्थित होते,
,भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदुर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरीत्रावर आधारित आँनलाइन कोलाज स्पर्धा(दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह) व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.ऑनलाइन कोलाज स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम क्रमांक -त्रुप्ती पिदुरकर वर्ग9वा (ड),द्वितीय-राखी संजय वैरागडे 10 वा (ड)आणि त्रुतिय-ऋतूजा खारकर वर्ग 9वा( ड)यांनी पटकाविला . उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक आदित्य प्रकाश अस्वले (11वी कला अ)द्वितीय क्रमांक अभिजित प्रमोद बाम्बोडे(12 वी क्रॉप सायन्स)
तृतीय क्रमांक प्रतीक्षा खडसे (12 कला क)प्रोत्साहनपर पुरस्कार दीक्षा विजेंद्र डंभारे (12 विज्ञान अ) गौरव बंडू वरारकर(12 विज्ञान अ) यांनी मिळविला,चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक जानव्ही रुमाजी सातपैसे (वर्ग 8 क) द्वितीय सृष्टी विनोद टोंगे( वर्ग 8 अ)
तृतीय क्रमांक प्रिया राजू येलमुले (वर्ग 7 अ)यांनी पटकीवला, स्पर्धेत,विजयी झालेल्या व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक,कृष्णा बततुलवार उपमुख्याध्यापीका,सौ,स्मिता चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षिका शोभा घोडे,तथा शिक्षक वृंदानि केले आहेत.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *