*विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण लुट थांबवा नाही तर गाठ युवासेनेशी – युवासेनेचा बीआयटी महाविद्यालयाला इशारा*

शिवाजी सेलोकर 

बल्लारपूर अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात (BIT)मायनिंग शाखेतील विद्यार्थ्यांकडून फ्लेम सेफ्टी लॅम्प हँडलिंगचे प्रमाणपत्र च्या नावाने लाखो पैसे उकडण्यात येत असल्याच्या माहिती मिळताच युवासेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने प्राचार्यांची भेट घेऊन याबद्दल विचारणा करण्यात आली व असे कृत्य थांबवावे अन्यथा विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेच्या स्टाईलने धडा शिकवायला जाईल अशी तंबी यावेळी देण्यात आली
सदर लॅम्प हँडलिंगचे प्रमाणपत्र हे डीजीएमएस च्या वेबसाईटवर निशुल्क उपलब्ध आहे मात्र या प्रमाणपत्राच्या नावाने एका दिवसीय प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र देनार असे म्हणून कुठलीही नोटीस न काढता ,कॉल करून विद्यार्थ्यांना या वाढत्या कोरोनाच्या प्रार्दुर्भावातही संस्थेमध्ये बोलविण्यात आले तंत्रनिकेतन (MSBTE)बोर्डाकडून व अभियांत्रिकी विद्यापीठानी काही नियमावली दिलेली असतानासुद्धा त्यांना तुडवत ,निर्देशाचे नियमांचे, उल्लंघन करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवून अर्धा-पाऊन तासाचा वर्ग घेऊन त्यांच्याकडून प्रत्येकी तब्बल १००० रुपये शुल्क घेण्यात येत आहे. त्यासंदर्भात युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे यांनी दुरध्वनी वरून प्राचार्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडविची उत्तरे देण्यात आले यावेळी स्वत: इंजिनीअर असलेल्या युवासेना जिल्हाप्रमुख यांनी तिथल्या प्राचार्यांना याबद्दल चांगलेच धारेवर धरले असता संस्थेच्याच एका प्राध्यापकाला प्रशिक्षण घेण्याचे सांगितल्याची बाब लक्षात आली म्हणजे आपल्याच विद्यार्थ्यांना आपणच मार्गदर्शन करून हजारो रुपये शुल्क घेण्याचा प्रकार यावेळेस लक्षात आला .त्यामुळे युवासेनेच्या शिष्टमंडळा कडून राजूरा उपजिल्हाप्रमुख प्रणित अहिरकर यांच्यासोबत युवा सैनिकांनी प्राचार्यांची भेट घेऊन सदर प्रकरणाची दखल घेऊन याची चोकशी करून विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे परत करावे व निशुल्क विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे याबाबत चर्चा करण्यात आली.आतापर्यंत साधारणतः १७३विद्यार्थांकडून आतापर्यंत हे शुल्क घेण्यात आलेले असुन पुन्हा दोनशे च्या वर विद्यार्थी बाकिच असल्याची बाब यावेळी कळली. व यापुढे असले चुकीचे कृत्य थांबवावे याकरिता युवा युवासेनेकडून निवेदन देण्यात आले . लवकरात लवकर या विषयाला घेऊन या विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्यास याबद्दल तंत्रशिक्षण विभाग मुंबई व उच्चतंत्रशिक्षण मंत्री मा. सामंत साहेब यांना सुद्धा याबद्दल पत्रकाद्वारे माहिती देण्यात येईल व युवासेनेने मार्फत आंदोलन घेण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला व सदर निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे ,युवासेना जिल्हाप्रमुख इंजि. निलेशभाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात व राजुरा युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रणित भाऊ अहिरकर यांच्या नेतृत्वात देण्यात आला.यावेळी राजूरा युवासेनेचे समन्वयक प्रविण पेटकर,सास्तीचे उपसरपंच कुणाल कुडे, वतन मादर, श्रि बुटले ,बंटी मालकर श्रीनाथ बल्लूवार , पंकज बुटले, स्वप्नील मोहरले, सुधांशू मेश्राम, क्रांती तुम्हावर यांची उपस्थिती होती

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *