सावित्रीबाई फुले विद्यालयात राष्ट्रीय हरित सेने मार्फत वृक्ष संवर्धनाचा संकल्प

By : Mohan Bharti

गडचांदूर : गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात रक्षाबंधन तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून हरित सेनेच्या वतीने वृक्षांना राखी बांधणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून तसेच स्व. हरिभाऊ डोहे गुरुजी यांना अभिवादन करून करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री धर्मराज काळे सर यांचे मार्गदर्शनाखाली हरित सेनेचे प्रभारी सुरेश पाटील यांनी सदर उपक्रमाचे आयोजन केले.वृक्षांना राखी बांधण्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी सुध्दा झाडांना राखी बांधली.याप्रसंगी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे, नामदेव बावनकर, राजू वासेकर तसेच शशिकांत चन्ने इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here