लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती
गडचांदूर, दि. 29 एप्रिल 2026:
‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ अंतर्गत महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या ऐतिहासिक विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व इतर विरोधी पक्षांविरोधात आज गडचांदूर शहरात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
संविधान चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर निघालेल्या या मोर्चात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हातात फलक, मशाली आणि काळे झेंडे घेऊन महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसचा निषेध केला.
“महिला आरक्षणाचे मारेकरी काँग्रेसचा निषेध असो”, “नारी शक्ती वंदन विधेयकाचे स्वागत”, “मोदी है तो मुमकिन है”, “सशक्त नारी – सशक्त भारत” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री कुमारी अल्का आत्राम म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना राजकीय सक्षमीकरण देण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले. पण काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांनी वर्षानुवर्षे केवळ आश्वासनं दिली. आता विविध कारणे पुढे करून विधेयकाला विरोध करणे म्हणजे महिलांचा विश्वासघात आहे.”
या मोर्चाचे नेतृत्व प्रदेश महामंत्री कुमारी अल्का ताई आत्राम यांनी केले. यावेळी महिला प्रदेश सचिव सौं. रेणुका दुबे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौं. वंदना ताई शेंडे, जिल्हा महामंत्री सौं. विजयालक्ष्मी डोहे, जिल्हा अनुसूचित आघाडी अध्यक्षा सौं. रंजना ताई मडावी, तालुका महामंत्री ॲड. दिपांजली मंथनवार, गडचांदूर शहर अध्यक्षा सौं. शीतल धोटे, सौं. उमाताई कंटाळे, नगरसेविका कीर्ती वैरागडे, नगरसेविका सौं. संगीता गाऊत्रे, कोषाध्यक्षा सौं. अपर्णा ताई उपलेंचिवार, नगरसेविका सौं. सपना शेलोकर, गोंडपिपरी शहर अध्यक्षा ॲड. सौं. अरुणा जाभुळकर, सौं. कोमल फरकाळे, सौं. अरुणा बेतावार, सौं. तेजस्विनी झाडे, सौं. पौर्णिमा आवाळे, सौं. त्रिवेना जगताप, सौं. सिंधू कापसे, सौं. इंदुताई कोरे, सौं. पायल येलमुळे, सौं. मनीषा भालेराव, सौं. शारदा फुसाटे, सौं. चंदा बुराटकर, सौं. मायाताई बावनवाडे, सौं. जयश्री येरेकर, सौं. मीनाली सोनटक्के, सौं. भारती गोखरे, सौं. सारिका नामवाड, सौं. प्रीती सातपाडी, साय. सारिका पिंपळकर, सौं. लताताई दरेकर, सौं. मनीषा भालेराव आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या.
तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश शर्मा, शहर अध्यक्ष अरविंद डोहे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचिवार, तालुका अध्यक्ष संजय मुसळे, शहर महामंत्री हरीश घोरे, युवा अध्यक्ष विकी उरकुडे, महामंत्री तथा नगरसेवक सतीश बेतावार, नगरसेवक हिमांशू नामवाड, सुरेश मेश्राम, सुरज पांडे, महामंत्री महेश घरोटे, उपाध्यक्ष अरविंद कोरे, युवा जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, व्यापारी अध्यक्ष विश्वाभर झाम, चिटणीस रमेश चुदारी, देवराव विधाते, शंकर आपुरकर, जयंता भोंगळे, देविदास पेंदोर, सचिन माली, साकीर भाई, जगन कापसे, गणपत बुरटकार, योगेश बांदुरकर, गणेश आदे, हरीश कुसले, मनोहर झाडे, संजय नीत आदींसह शेकडो महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
या भव्य आक्रोश मोर्चाने गडचांदूरमध्ये महिला शक्तीचे प्रभावी प्रदर्शन घडवून आणले.





