लोकदर्शन जिवती 👉शिवाजी सेलोकर
जिवती येथे पंडित दीनदयाल प्रशिक्षण महाभियानाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संघटन बळकटीकरणासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
या प्रशिक्षण महाभियानाचे प्रमुख वक्ते म्हणून राजेन्द्र गांधी, साकेत भानरकर, देवराव भोंगळे, तनय देशकर, हरीश शर्मा आणि सतीश उपलेंचवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पक्षाची विचारधारा, संघटन विस्तार आणि प्रभावी कार्यपद्धती यावर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून केशवराव गिरमाजी (जिल्हा उपाध्यक्ष), महेश देवकते (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा), गोविंद तोगरे तसेच दत्ता राठोड (तालुका अध्यक्ष, भाजपा) यांची उपस्थिती लाभली.
या वेळी मान्यवरांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आवाहन केले. तसेच आगामी काळात जनतेपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुयोग्य पद्धतीने केले असून आगामी सत्रांमध्ये विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.





