Home
Home गडचांदूर / कोरपणा मामुलकर साहेबांनी राष्ट्रसंताच्या विचाराने चांगला समाज घडविण्याचे कार्य केले : अविनाश जाधव

मामुलकर साहेबांनी राष्ट्रसंताच्या विचाराने चांगला समाज घडविण्याचे कार्य केले : अविनाश जाधव

By : Shankar Tadas

गडचांदूर :

राजकारणासोबत समाज कारण करून सेवा करण्याचे कार्य मामुलकर साहेबांनी केले. गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी माणूस घडवण्याचे कार्य करतात त्याचप्रमाणे साहेबांनी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून राजुरा,कोरपना, जिवती व गोंडपिपरी या अतिदुर्ग आदिवासीबहुल व दुर्लक्षित असलेल्या तालुक्यात शिक्षणाची गंगा पोहोचवली. आवाळपूर येथे मारोतराव बोढे यांच्या सहकार्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 1981 ला शिक्षणाचे दारे उघडे करून दिले.आज घडीला मराठी शाळा या इंग्रजी शाळेमुळे मागे पडल्या मात्र मराठी शाळां या ग्रामीण शिक्षणाचा कणा आहे .लोकसहभागातून उभे राहिलेल्या या शाळांना व समाजाला आज सुद्धा राष्ट्रसंताच्या विचाराची गरज आहे. पुढील पिढी घडवण्यासाठी हे विचार मोलाचे आहेत. असे प्रतिपादन अविनाश जाधव सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, श्री गुरुदेव सेवा मंडळ राजुरा,श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ आवळपूर, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आवाळपुर तथा समस्त आवाळपुर ग्रामवासी यांनी शनिवारला आयोजित क्रीडा संकुल ग्रामपंचायतआवळपूर येथील भव्य पटांगणात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रतिपादन केले.

याप्रसंगी उद्घाटक म्हणून एडवोकेट संजय धोटे माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र व कार्याध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा यांनी सुद्धा संबोधित करताना सांगितले की किर्तन व भजन यांच्या स्पर्धामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचतात. ग्राम स्वच्छता अभियान यामुळे स्वावलंबन वाढते .नैतिकता चांगल्या विचाराचा समाज घडवण्याचे कार्य यामधून होते.जे की काळाची गरज आहे.त्यामुळे समाजाने राष्ट्रसंतांचे विचाराची कास धरावी. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून साजिद बियाबानी कोषाध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, शिवचंद्र काळे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर,सेवानिवृत्त प्राचार्य डाहुले, खेरानि सर उपप्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा, प्रियंका दिवे सरपंच ग्रामपंचायतआवळपूर,बाळकृष्ण काकडे उपसरपंच ग्रामपंचायत ग्रामपंचायतआवळपूर, कल्पतरू कन्नाके सदस्य ग्रामपंचायतआवळपूर,मनीषा कोट्टे सदस्य ग्रामपंचायत आवळपूर, शारदा मोहुले सदस्य ग्रामपंचायतआवळपूर ,बंडूजी कवाडे माजी सदस्य ग्रामपंचायत आवळपूर, सुरेश टेकाम माजी उपसरपंच ग्रामपंचायत आवळपूर, सुरेश धोटे अध्यक्ष तंटामुक्ती आवळपूर, बंडूची उरकुडे प्राचार्य झुरळे सर इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. स्वागत गीता द्वारे व पुष्पगुच्छ देऊन पाहण्याचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सचालन काकडे सर यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य वारकड सर शिवाजी महाविद्यालय राजुरा यांनी केले.

शनिवारी सकाळपासून कार्यक्रमाची सुरुवात ग्राम स्वच्छता अभियानाद्वारे करण्यात आली. दुपारला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रबोधनात्मक किर्तन व राज्यस्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धेचे उद्घाटन सुधाकर कुंदजवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर व अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा यांनी केले. याप्रसंगी आजच्या पिढी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार बाजूला ठेवून जगत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रबोधनात्मक कीर्तन व भव्य खंजिरी स्पर्धेच्या आयोजना मधून तरुण पिढीला राष्ट्रसंत चे विचार आत्मसात करण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळे तरुण पिढीने अशा कार्यक्रमाद्वारे राष्ट्रसंताचे विचार आत्मसात केले पाहिजे.असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले .

प्रबोधनात्मक किर्तन डॉ.रामपाल महाराज धारकर यांनी सादर केले . त्यानंतर लगेचच विविध मंडळाद्वारे भजन स्पर्धा सुरू झाली.याच प्रसंगी पंचक्रोशीतील शेकडोच्या संख्येने स्त्री व पुरुष व बालगोपाल नागरिक किर्तन व भजन आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम सोमवार पर्यंत होत असल्यामुळे नागरिकां मध्ये उत्साहचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांच्या स्वयंसेवकाच्या अतिशय परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here