By : Shankar Tadas
पुणे :
राष्ट्रीय पुस्तक महोत्सव 2025, पुणे मध्ये ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ पुस्तकाचे प्रकाशन
फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पुस्तक महोत्सव २०२५ मध्ये, डॉ. रिता मदनलाल शेटीया लिखित सर्जनशील लेखन (‘क्रिएटिव्ह रायटिंग’ ) या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ पत्रकार आणि कॉर्पोरेट सिटीझन आणि मनी लाइफ मासिकेच्या संपादिका विनिता देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी डॉ. रिता यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विनिता देशमुख म्हणाल्या , ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ आजच्या काळाची गरज आहे. आज सोशियल मीडिया असेल, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर तुम्हाला लिहिण्याची संधी मिळते , तुमचे लिखाण वाचकाना आकर्षित आणि खिळवून ठेवणारे हवे . त्यावरच हे पुस्तक लिहिले गेले आहे , ज्यातून तुम्हाला लिखाण कसे हवे, कोणत्या पायऱ्या लिहिताना वापरायला हव्यात , लिखाणाचे नियम या सर्वांचा उल्लेख या पुस्तकात आहे.
डॉ. रिता यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार निवड-आधारित क्रेडिट सिस्टम नुसार हे पुस्तक लिहिले असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गरज, आवड लक्षात घेऊन ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ विषयाबद्दल विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि आवड समजून घेण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी हे सोप्या आणि स्पष्ट भाषेत लिहिले आहे. या पुस्तकात चार प्रकरणे आहेत. सर्जनशील लेखनाची मूलभूत तत्त्वे, सर्जनशील लेखनाचे घटक, सर्जनशील लेखनाचे पारंपारिक प्रकार आणि सर्जनशील लेखनात नवीन ट्रेंड या प्रकरणांचा समावेश असून संकल्पना जाणून घेण्यासाठी अर्थ, महत्त्व, चित्रे आणि फॉर्म इत्यादी दिले आहेत. क्रेडिट सिस्टम विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे; म्हणूनच पुस्तक सोपे आणि योग्य बनवण्यावर भर देण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्जनशील लेखन (क्रिएटिव्ह रायटिंग) शिकण्याचे कौशल्य वाढू शकेल.
यावेळी टी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ. सुनील भंडगे, सरस्वती मंदिर नाईट महाविद्यालयाचे ग्रंथपाल राजेश अगवणे, सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनीताई बिवलकर आणि माजी शिक्षिका डॉ. सविता शेटीया उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश माळी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मर्सी नुअमनीलम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





