Home
Home मुंबई “मिरा–भाईंदरमध्ये शिक्षक स्नेहसंमेलन व परिसंवाद उत्साहात संपन्न; आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते...

“मिरा–भाईंदरमध्ये शिक्षक स्नेहसंमेलन व परिसंवाद उत्साहात संपन्न; आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांचा सन्मान”

लोकदर्शन “मिरा–भाईंदर👉मोहन भारती

मिरा–भाईंदर शहरात शिक्षकांच्या सृजनशीलतेला, कार्यकर्तृत्वाला आणि सामाजिक योगदानाला सलाम करणारा शिक्षक स्नेह मिलन व परिसंवाद कार्यक्रम दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. सेवेन स्क्वेअर अकॅडमी शाळेच्या भव्य प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास शिक्षक, मान्यवर आणि शिक्षणप्रेमी नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे आयोजन माजी महापौर मा. श्रीमती निर्मला साबळे व पूर्व प्रधानाचार्य श्री. सुशीलकुमार दुबे (शिक्षक प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष) यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. कार्यक्रमाला मिरा–भाईंदर शहराचे लोकप्रिय आमदार मा. श्री. नरेंद्र मेहता साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच श्री. दिलीप जैन, जिल्हाध्यक्ष यांचीही उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.

कार्यक्रमात उपक्रमशील, विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव व सन्मान करण्यात आला. शिक्षणासोबतच कला, साहित्य, संस्कृती आणि समाजकार्यात अग्रेसर असलेल्या शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक करत आमदार नरेंद्र मेहता साहेब यांनी शिक्षक हे समाज घडविणारे खरे शिल्पकार असल्याचे प्रतिपादन केले.

या स्नेहसंमेलनात शिक्षकांच्या कलागुणांना मुक्त व्यासपीठ देण्यात आले. काही शिक्षकांनी पारंपरिक पोवाडा गायन, भावस्पर्शी गीत गायन तसेच काव्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणांमुळे कार्यक्रमात सांस्कृतिक रंगत निर्माण झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दयानंद किलचे सरांनी अत्यंत प्रभावी व ओघवत्या शैलीत केले. त्यांच्या सुसूत्र मांडणीमुळे कार्यक्रम अधिकच संस्मरणीय ठरला.

साहित्यिक क्षेत्रातील नेत्रदीपक व अभिनव कर्तृत्वाबद्दल अभिनव विद्यामंदिर, हिंदी माध्यम, भाईंदर (पूर्व) येथील शिक्षिका डॉ. सौ. शुभांगी गणेश गादेगावकर यांचा विशेष सत्कार आमदार मा. श्री. नरेंद्र मेहता साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, शिक्षक आणि उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. आपुलकी, संवाद आणि सन्मान यांचा संगम असलेला हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here