महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन जील्हाप्रतीनिधी👉.प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नुकतेच व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन शिबीर पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य स्मिता चिताडे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव धनंजय गोरे, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे टीचर कोच नितीन कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी पूर्विता मून हिने एमपीएससीमध्ये कर सहाय्यक या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून महिलांमधून राज्यात सातवा क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिने विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा प्रफुल्ल माहुरे यांनी केले,
कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप परसुटकर यांनी केले. तर आभार प्रा. सुधीर थिपे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here