शेनगाव येथील नवनिर्वाचित सदस्यांचा आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते सत्कार. तर विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– जिवती तालुक्यातील मौजा शेनगाव येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दुर्गा कोडापे, चंद्रभागा पोले, अंजना नंदेवाड, अजय तिरनकर यांचा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सेनगाव येथील रघुनाथ जाधव, दिगंबर चव्हाण, प्रमोद राठोड, नागोराव जाधव, बाळू सलगर, उत्तम शिंदे, सुनील घुले यासह अनेक विविध पक्षातील कार्यकर्त्यांना काँग्रेसचा दुपट्टा घालून काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आले. हा छोटेखानी कार्यक्रम आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे घेण्यात आला.
या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते महादेव डोईफोडे, अजगर अली शेख, महादेव शेलडे, वैद्यनाथ गगनाथ, दिगंबर पोले, साधू सलगर, गौरव कांबळे, केशव पवार, धारूबा पवार यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here