*महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीजींना अभिवादन*

 

*लोकदर्शन 👉डॉ नंदकिशोर मैंदळकर*

*चंद्रपूर*:- 2 ऑक्टोंबर ला महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती निमित्त सेवा दल मुलींचे वस्तीगृह चोखामेळा मुलींचे वस्तीगृह स्नेहा मुलींचे वस्तीगृह यांच्यातर्फे गांधीजी व शास्त्रीजी यांना अभिवादन करण्यात आले अमृतकर मॅडम ने आपल्या उद्बोधनात गांधीजीने गोहत्या बंदी, नशाबंदी, अस्पृश्यता निवारण करण्याचा प्रण केला होता ते प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे. शास्त्रीजीने जय जवान जय किसान चा नारा दिला. जोपर्यंत किसान समृद्ध होत नाही व जवान सशक्त होत नाही तोपर्यंत हिंदुस्तान विश्वगुरू होणार नाही. आज देश विश्वगुरू च्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे सदर कार्यक्रमाला सेवा दल संस्थेचे अध्यक्ष अशोक आक्केवार, सुभाष नरुले, डॉ नंदकिशोर मैंदळकर, अमृतकर मॅडम, गंगाधर गुरूनुले,कविता शेंडे, अधीक्षिका कोमल आक्केवार, पुनवटकर, वाढई, सचिन बरबटकर तसेच वस्तीगृहाच्या संपूर्ण मुली कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here