इन्फंट कान्व्हेंट येथे डॉ. आंबेडकरांना अभिवाद

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*⭕विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची महामानवास मानवंदना.*

राजुरा (ता.प्र) :– ज्या महामानवाने भारताला संविधान बहाल केले, लाखो दलित, पीडित बांधवांच्या जीवनात प्रकाश किरण आणला अशा थोर विद्वान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा च्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. दिपप्रज्वलन तथा प्रतिमेला माल्यार्पण करून सर्वानी महामानव डॉ. आंबेडकरांना केले अभिवादन तर विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी दिली महामानवास मानवंदना.
या प्रसंगी इयत्ता ७ वी ब चा विद्यार्थी आलेश देठे यांनी बाबासाहेवांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, कस्तुरी मशारकर या विद्यार्थिनीने सावींधान आणि बाबासाहेब या विषयावर आपले मत मांडले,दिवयानी वाभीतकर या विद्यार्थ्यांनिंने एक नाटिका सादर केली. वर्ग 9 च्या मुलांनी संस्कृती फरकडे, चरित्र मशारकर, साहिल लांडे, मैनज शेख, झैद बेग यांनी जीवनपटातील कथा सादर केल्या , तथा 10 च्या मुलांनी सुंदर पोस्टर रंगवून आपली कला सादर केली. वर्ग चौथी आणि पाचव्या मुलासाठी रॉक पेंटिंग आणि एनविलोप मेकिंग हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सरोज गाडगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here