” महापुरुषांच्या विचारांचा स्वविकार करून आचरण करावे – संजय साडेगावकर !

लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉 महादेव गिरी


वालुर येथील संत सावता मित्र मंडळाच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच संजय साडेगावकर होते तर प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य विलास सोनवणे, उपसरपंच गणेशराव मुंढे, शैलेश तोष्णीवाल, अंजाराम सोनवणे, राजेश साडेगावकर,गोपाळ आबुज,ग्रामपंचायत सदस्य वाहेद पठाण आदि उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अरपण करून अभिवादन करण्यात आले.पुढे बोलतांना संजय साडेगावकर म्हणाले महात्मा फुले यांनी सांगितलेल्या विचार अंगीकृत करून चालले तर समाज सुधारणा होऊन मानवी जिवण सुजलाम सुफलाम होईल.यावेळी राहुल खपले यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर महात्मा फुले यांच्या प्रतिमेची गावातील मुख्य रस्त्यावरुन ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अँड.संदिप डाके यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी जिवणे, रंगनाथ सोनवणे, रामकृष्ण मगर, सुरेश शिंदे, विनायक जिवणे, भगवान सोनवणे,बालाजी हारकळ, इंद्रजित सोनवणे, राजेश सोनवणे व संत सावता मित्रमंडळाचे पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here