डोंबिवली नवचैतन्य सामाजिक संस्थेचे राज्यातील ७५ जणांना पुरस्कार

लोकदर्शन मुंबई ; 👉 राहुल खरात

नवचैतन्य सामाजिक विकासक संस्था (डोंबिवली) तर्फे
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ७५ सामाजिक सेवेकरांना डोंबिवली येथील रेती भवन हाँलमध्ये कविवर्य श्री विलास खानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट नाट्य व दूरदर्शन कलावंत श्री भूषण कडू यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार शाल, श्रीफळ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यात समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक सर्वश्री राजेंद्र लकेश्री, श्रीमती सुन्नी रेवती आळवे, डॉ. अमित दुखंडे, खंडू माळवे, नित्यानंद वाळंज, धनंजय कोरगावकर व दत्ताराम वंजारे यांच्यासह विविध क्षेत्रातील ७५ मान्यवर सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविकपर भाषण संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष सावंत यांनी करून संस्थेच्या कार्याची महिती दिली. आणि कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. शशिकांत सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here