आटपाडी ची शाळा १११ वर्षा ची झाली !

⭕दशरथ नागणे, रणजित सागर, अजय भिंगे, संदिप काळे यांचा सरपंच वृषाली पाटील यांच्या हस्ते सत्कार !

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

⭕आटपाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ चा १११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

आटपाडी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ ही दिनांक १ एप्रिल १९११ रोजी स्थापन करण्यात आली होती, शाळेला १११ वर्षे झाल्याबद्दल
लोकनियुक्त सरपंच सौ. वृषालीताई पाटील व ॲडव्होकेट श्री. धनंजय पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सदर शाळेचा शैक्षणिक दर्जा हा चांगला राखल्याबद्दल तसेच या स्पर्धेच्या युगात १ ते ४ वर्गाची विद्यार्थी पटसंख्या १९३ पर्यंत वाढवल्याबद्दल सर्व शिक्षकांचा सन्मान सरपंच वृषाली पाटील व पालकांच्या शुभहस्ते करण्यात आला. आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत गावात व वाडी वस्त्यांवर तब्बल २६ जिल्हा परिषद शाळा असून सर्वच शाळांचा शैक्षणिक गुणवत्ता दर्जा हा चांगला असल्याने पालकांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या मुलांचा प्रवेश घेऊन आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल करावे असे आवाहन सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी केले.
यावेळी शाळेला वेगवेगळ्या वस्तु च्या रुपात मदत करणारे पालक श्री. दशरथ नागणे, श्री. रणजीत सागर , श्री. अजय भिंगे व श्री. संदीप काळे यांचाही सत्कार सरपंच यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. महेश चांडवले, श्री. मनोज राक्षे, श्री.सचिन सपाटे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय राजमाने सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. शिवाजी लेंगरे सर, श्रीमती योगिता शिंदे, काका पाटील, स्मिता पाटील श्रीमती आयोध्या भटके व तंत्रस्नेही शिक्षक राजेंद्र कांबळे सर व अनेक पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिवाजी लेंगरे सर यांनी केले व आभार श्रीमती योगिता शिंदे मॅडम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here