गोंदिया ः निवासी उपजिल्हाधिकारी देशपांडे यांना निवेदन देताना संघर्ष समितीचे पदाधिकारी व नवनिर्वाचित सदस्य.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

 

आेबीसी संघर्ष समितीने पाठविले मुख्यमंत्र्यांना निवेदन
जिल्हा परिषद व पंचायत समितीत पदस्थापना त्वरित करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आेबीसी संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्र्यांना पाठविले आहे. लोकप्रतिनिधीअभावी सर्वसामान्यांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. समान तारखांना निवडणुका होऊन नगर पंचायतीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बाबतीत ग्रामविकास मंत्रालय अडवणुकीची भूमिका का घेत आहे?, राज्य सरकार आणि ग्रामविकास मंत्रालयाने या संदर्भातील भूमिका काय ते २५ मार्चपर्यंत कळवावी, याबाबतची भूमिका स्पष्ट न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असे संघर्ष समितीने निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य आनंदा वाढीवा, विमल कटरे, पंचायत समिती सदस्य मुनेश रहांगडाले, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबलू कटरे खेमेंद्र कटरे, उद्धव मेहेंदळे, अमर वराडे, रत्नदीप दहीवले,जि प सदस्य जितेंद्र कटरे उपस्थित होते.
…………………………………………………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here