मुक्या,भटक्या प्राण्याकरिता दारापुढे पाण्याची व्यवस्था करा : डॉ मैंदळकर.                                                     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरण तापू लागले आहे मार्च महिन्यात अंगाची लाही लाही होत आहे आणखी तीन महिने बाकी आहेत उन्हाळ्यात माणसाप्रमाणे प्राण्यांनाही थंड पाण्याची आवश्यकता आहे त्याचे चटके प्राण्याला जास्त सहन करावे लागतात कारण मुक्या जनावरांना त्यांची गरज सांगता येत नाही गावात किंवा शहरात मुके प्राणी पाण्याकरिता चाऱ्याकरिता वन वन भटकताना दिसतात तेव्हा आपण प्राण्यांविषयी भूतदया दाखवा आपल्या दारापुढे पाण्याने भरलेले भांडे ठेवा व आपल्या घरात उरलेला भाजीपाला उकिरड्यावर न फेकता दारापुढे पेपरवर अथवा स्वछ जागेवर ठेवावा जेणेकरून ते प्राणी आपली भूख व तहान भागवू शकतील उन्हाळ्यात चारा व पाण्यावाचून अनेक प्राणाचे प्राण जातात पाण्याच्या दुर्भिष्णतेमुळे जनावरे मृत्युमुखी पडतात अश्या प्राण्याची सेवा म्हणजे ईश्वरीय सेवा होय मानवाची तृष्णा भागविण्याकरिता पाणपोई लावतात मुक्या प्राण्याकरिता चारा,पाण्याची व्यवस्था करा यातून मिळणारा आनंद आत्मिक आनंद असेल असा आनंद विकतही घेता येणार नाही आपल्या शहरात अनेक मोकाट जनावरे फिरतात त्यांच्याकरिता दारापुढे चौकाच्या बाजूला जिथे जागा उपलब्ध होईल तिथे पाणवठे (पाणपोई) ठेवा ग्रामीण भागात पाणवठे बांधा ग्रामपंचायत,मंडळ,सामाजिक संस्था यांनी पुढाकार घ्यावा व या ईश्वरीय कार्यात तण, मन, धनाने सहकार्य करावे व मुक्या प्राण्याचे सेवेचे व्रत अंगिकरावे आपण केलेले सत्कार्य,पशुप्रेम यांचे अनुकरण इतरही महानुभाव करतील पशुप्रेम वृद्धिंगत होईल अशी आशा बाळगतो.जय पशुसेवा.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *