महात्मा गांधी विद्यालय,उच्च माध्यमिक विद्यालयात शहीद दिन साजरा।                                                     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे शहीद दिन साजरा करण्यात आला,
देशाच्या स्वातंत्र्य करीता हसत हसत आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापीका तथा प्राचार्या सौ,स्मिताताई चिताडे होत्या.प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे ,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षिका शोभाताई जीवतोडे,एम.सी.व्ही. सी.विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे होते.सर्वप्रथम क्रांतिवीर शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
पर्यवेक्षिका शोभा जीवतोडे, व वामन टेकाम यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
प्रास्ताविक उपप्राचार्य विजय आकनूरवार यांनी केले. संचालन वामन टेकाम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. नंदा भोयर यांनी केले.याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी दिन विशेष समिती च्या सदस्यांनी मेहनत घेतली,.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here