युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕राजुरा येथे युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

राजुरा :– चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस कमेटीचे नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, राहुल उमरे, राजुरा विधानसभा अध्यक्ष मंगेश गुरणुले, उपाध्यक्ष शैलेश लोखंडे, मुन्ना माशिरकर, विलास वाघमारे, विधानसभा महासचिव अशोक राव यांचा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर राजुरा तालुका काँग्रेस कमिटी च्या कार्याध्यक्षपदी एजाज अहमद यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन राजुरा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, युवक काँग्रेस ही काँग्रेस पक्षाची शक्तीवाहीनी असून अखिल भारतीय ते स्थानिक पातळीवर काँग्रेसने युवकांना व्यापक संधी देऊन राजकीय क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक मोठे नेते चंद्रपूर जिल्ह्य़ाला, महाराष्ट्र आणि देशाला लाभले आहेत. येणाऱ्या काळात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना क्षेत्र, राज्य आणि देशाचे नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अधिकाधिक युवकांना काँग्रेसशी जोडून पक्षाला जनमानसात मजबूत करण्यासाठी तसेच निरंतर विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तर सत्काराला उत्तर देताना शंतनु धोटे यांनी सांगितले की, जिल्ह्य़ात काँग्रेसच्या युवकांनी मला भरघोस मते देऊन विजयी केले आणि युवक काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली याबद्दल मी सदैव आपला ऋणी राहीन. येणाऱ्या काळात लोकसेवेसाठी, जिल्ह्य़ात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुर्ण क्षमतेने काम करू असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, गणपत आडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, कुंदाताई जेणेकर, विक्रम येरणे, उमेश राजूरकर, रोशन आस्वले, राकेश पून, संतोष बंडावार, कंटु कोटनाके, जितेंद्र गोहणे, सुनील शेडके, देवाडाचे विलास शेंडे, शंकर चिन्नुरवार यासह चारही तालुक्यातील काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एजाज अहमद यांनी केले. संचालन संतोष शेन्डे यांनी तर आभार प्रदर्शन रंजन लांडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here