दत्तात्रय मिटकर समाज भुषण पुरस्काराने सन्मानित”

लोकदर्शन वालुर प्रतिनिधी👉 महादेव गिरी

सेलु येथील प्रसिद्ध व्यापारी दत्तात्रय मिटकर यांना समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शेतकरी ,कष्टकरी कुंटुबात जन्मलेले दत्तात्रय मिटकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वताचे दहावी पर्यंतशिक्षण पुर्ण करून परभणी या ठिकाणी पदविचे शिक्षण पुर्ण केले. चारठाणा या ठिकाणी आरोग्य सेवक म्हणुन कर्तव्य बजावले. समाजातील गोर गरीब यांना अडचणीत नेहमीच मदत करून आपले सामाजिक कर्तव्य नेहमीच पार पाडले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सेलु येथील शंकरलिंग मंदिर संस्थानच्या वतीने त्यांना समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.दत्तात्रय मिटकर यांना समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात आल्यामुळे शिवगर्जना मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here