Home
Home गडचांदूर / कोरपणा “भाजपची विचारधारा घराघरांत पोहोचवा; अंत्योदय हाच कार्याचा गाभा” – आमदार देवराव भोंगळे

“भाजपची विचारधारा घराघरांत पोहोचवा; अंत्योदय हाच कार्याचा गाभा” – आमदार देवराव भोंगळे

लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती

गडचांदूर, दि. १० :एप्रिल 2026
भारतीय जनता पक्ष हा सामान्य माणसाच्या कल्याणासाठी कार्य करणारा पक्ष असून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’ विचारावर पक्षाची वाटचाल आधारित आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने हा वैचारिक वारसा जपत केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन हॉलमध्ये आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत दोन दिवसीय निवासी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश व राज्य प्रगतीच्या मार्गावर आहे. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हीच आपली प्रमुख जबाबदारी आहे.

पुढे ते म्हणाले की, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.

या कार्यशाळेस भाजपचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, एसआयआर अभियान प्रमुख सतिश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरुण डोहे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here