लोकदर्शन घुग्घुस 👉शिवाजी सेलोकर
घुग्घुस : भारतीय जनता पक्ष (भाजपा) स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात उत्साहात कार्यक्रम पार पडला. नगरसेवक विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचा भगवा ध्वज फडकविण्यात आला.
या प्रसंगी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, दरवर्षी ६ एप्रिल हा दिवस भाजपाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. ६ एप्रिल १९८० रोजी पक्षाची अधिकृत स्थापना झाली. १९८४ साली केवळ दोन जागांपासून सुरुवात करणाऱ्या भाजपाने आज देशातील तसेच जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष होण्याचा मान मिळवला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, भाजपा हा केवळ पक्ष नसून एक परिवार आहे आणि तो ‘राष्ट्र प्रथम’ व ‘अंत्योदय’ या मूलभूत तत्त्वांवर कार्य करतो.
कार्यक्रमाला प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, नगरसेवक निरीक्षण तांड्रा, भाजपा नेते अमोल थेरे, नगरसेविका चैताली सातपुते, युवानेते गणेश कुटेमाटे, नितु चौधरी, सुषमा सावे, बबलू सातपुते, विनोद चौधरी, सिनू इसारप, चंद्रकला मन्ने, निशा उरकुडे, प्रीती धोटे, धनराज पारखी, असगर खान, सचिन नांदे, सुनंदा लिहीतकर, हनुमान खडसे, भारती पर्ते, जाई आत्राम, खुशबू मेश्राम, प्रिया नागभीडकर, अजय लेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





