लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत गडचांदूर शहर मंडळ स्तरीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून हा दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग ९ व १० एप्रिल २०२६ रोजी बालाजी सेलिब्रेशन हॉल, गडचांदूर येथे पार पडणार आहे.
या प्रशिक्षण वर्गात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक कौशल्य, विचारधारा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
पहिल्या दिवसाचे नियोजन (९ एप्रिल)
९ एप्रिल रोजी प्रशिक्षण वर्गाची सुरुवात नोंदणी, एकत्रीकरण व व्यवस्था परिचयाने होणार आहे. त्यानंतर उद्घाटन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. पुढील सत्रांमध्ये कार्यकर्त्यांना “आपली कार्यपद्धती” याविषयी मार्गदर्शन दिले जाणार आहे.
दुपारच्या सत्रात वैचारिक अधिष्ठान तसेच जनसंघ ते भाजपचा इतिहास आणि विकास या विषयांवर चर्चा होणार आहे. सायंकाळी खेळ व शाखा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर सोशल मीडिया, एआय, नमो अॅप आणि सरल अॅप यांचा वापर यावर विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. दिवसाचा शेवट भोजन व मनोरंजन सत्राने होणार आहे.
दुसऱ्या दिवसाचे नियोजन (१० एप्रिल)
१० एप्रिल रोजी सकाळी जागरण चर्चा, शाखा व योग यांसारख्या उपक्रमांनी दिवसाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर बुथ प्रबंधन व कार्य विस्तार यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
पुढील सत्रात केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना तसेच सरकारी कामगिरी याबाबत माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण वर्गाचा समारोप समारोप सत्राने होऊन शेवटी भोजनानंतर प्रस्थान होणार आहे.
अपेक्षित सहभाग
या प्रशिक्षण वर्गात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्याची अपेक्षा असून, संघटन बळकटीसाठी हा वर्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.





