Home
Home गडचांदूर / कोरपणा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सुदाम लांडे प्रथम

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सुदाम लांडे प्रथम

By : Shankar Tadas
कोरपना :
माध्यमिक आश्रम शाळा धानोली येथे कोरपना तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठीच्या
या विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता. प्रयोगशाळा परिचर या गटातुन
प्रियदर्शनी हायस्कूल पारडी येथील प्रयोगशाळा परिचर सुदाम मधुकर लांडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जोगदंड साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपना, , गंगशेट्टीवार सर मुख्याध्यापक माध्यमिक आश्रम शाळा धानोली तसेच इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी इतर पुरस्कार सुद्धा वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग, विद्यार्थी व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून सुदाम लांडे यांचे अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here