Home
Home गडचांदूर / कोरपणा �गडचांदूर – प्रभाग क्र. ५ मध्ये निर्दलीय उमेदवार निलेशभाऊ ताजने यांच्या नेतृत्त्वाखाली...

�गडचांदूर – प्रभाग क्र. ५ मध्ये निर्दलीय उमेदवार निलेशभाऊ ताजने यांच्या नेतृत्त्वाखाली भव्य रॅली व विकाससभा

✍️ : लोकदर्शन न्यूज पोर्टल👉रवि गेलडा

गडचांदूर : येथील सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ५ मधून निर्दलीय उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या मा. निलेशभाऊ ताजने यांच्या नेतृत्वाखाली गडचांदूर शहर विकास आघाडीच्या वतीने भव्य रॅली व विकाससभा पार पडली. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

रॅलीदरम्यान मा. निलेशभाऊ ताजने, तसेच प्रभाग क्र. ५ चे उमेदवार श्री. निखिल बुरांडे आणि सौ. अश्विनी कांबळे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला.

निलेशभाऊंनी या भेटीत प्रभाग विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजनांची रूपरेषा सादर केली—

🔹 आरोग्य, पाणी, रस्ते, ड्रेनेज व वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये तात्काळ सुधारणा
🔹 स्वच्छ व हरित गडचांदूरसाठी विशेष स्वच्छता अभियान
🔹 महिला व युवकांसाठी विशेष कौशल्य विकास उपक्रम
🔹 वृद्ध व दिव्यांगांसाठी सुविधा-समृद्ध प्रभाग निर्मिती
🔹 शाळा, अंगणवाडी व सार्वजनिक सुविधा केंद्रांचे उन्नतीकरण

यावेळी नागरिकांनीही आपल्या समस्या आणि अपेक्षा उत्साहाने मांडल्या. सर्व प्रश्नांना त्वरित प्रतिसाद देत निलेशभाऊंनी त्यांच्या निकाली प्रामाणिकपणे लक्ष देण्याचे ठाम आश्वासन दिले.

नागरिकांचा मोठा उत्साह, विश्वास आणि साथ पाहता प्रभाग क्र. ५ मध्ये निलेशभाऊ ताजने यांचे जनाधार दिवसेंदिवस बळकट होत असल्याचे स्पष्टपणे जाणवले. विकासाच्या दिशेने ही मोहीम अधिक वेगाने पुढे सरकत असून गडचांदूरच्या परिवर्तनाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here