Home
Home गडचांदूर / कोरपणा प्रेरणा कॉलेजमध्ये कलाक्षेत्रातील विविध संधींवर मार्गदर्शन

प्रेरणा कॉलेजमध्ये कलाक्षेत्रातील विविध संधींवर मार्गदर्शन

By : Shankar Tadas

गडचांदूर: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे अंगी असुदे एकतरी कला अन्यथा जीवन फुका गेला ”यानुसार प्रत्येक व्यक्तीने कोणती तरी कला व छंद नक्की जोपासले पाहिजे, त्यामुळे आपल्या जीवनात अर्थपूर्णता येते, नैराश्यावर मात करून आनंदी जीवन जगण्यासाठी कला उपयुक्त ठरते .म्हणून कलाक्षेत्रातही करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रातील संधीच्या माध्यमातून करियर करून आपलं जीवन यशस्वी घालवावे, असे प्रतिपादन चेताक्ष नाट्य मंडळाचे निर्माता मा. संतोष कवठे यांनी केले. ते युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित प्रेरणा महाविद्यालयात आयोजित कला क्षेत्रातील विविध संधी या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण आंबटकर सर होते. तर यावेळी प्रा. दुर्गा खुबाळकर, प्रा. इजाज शेख, प्रा.खनके , प्रा. पवार, प्रा. वरकड, प्रा. क्रांती कासले, कुंजन शेंडे, यश ताकसांडे, अर्चना मुत्यलवार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रवीण आंबटकर यांनी जीवनात आपल्या व्यक्तिमत्वानुरूप आवडीनुसार विविध संधी उपलब्ध होतात. त्या संधीचे सोने करण्यासाठी प्रामाणिक परिश्रम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.महाविद्यालयाच्यवतीने शाल श्रीफळ देऊन संतोष कवठे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन प्रा.दुर्गावती खुबाळकर यांनी तर प्रास्ताविक प्रा . इजाज शेख यांनी व आभार विद्यार्थिनी सुमन नैताम हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here