Home
Home गडचांदूर / कोरपणा अखेर शेतकऱ्याने सोयाबीन पीक जाळून टाकले !!

अखेर शेतकऱ्याने सोयाबीन पीक जाळून टाकले !!

By : Shankar Tadas
कोरपना : तालुक्यातील कढोली खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिलीप मनोहर अवताडे आणि त्यांची पत्नी माधुरी दिलीप अवताडे यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पिकाचा ढीग अखेर अखेर जाळून टाकला. कढोली खुर्द येथील आणखी एका शेतकऱ्याने यापूर्वीच सोयाबीन पीक जाळून टाकल्याचे विडिओ तसेच बातम्या झळकल्या होत्या.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक खराब झाले असता नाही थोडीतरी पदरात पडेल या आशेने कापणीचा खर्च शेतकऱ्यांनी केला. मात्र त्यावरही पावसाने कहर केल्याने पीक सुकले नाही. त्यामुळे सोयाबीन दाणे जागीच सडून गेले. त्यामुळे पीक काढणी चा खर्च सुद्धा निघणे कठीण झाले. त्यामुळे नाईलाजाने पीक जाळून टाकावे लागल्याचे. दिसून येत आहे. शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या वी अशी मागणी सदर शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here