सोनुर्लीजवळ भीषण अपघात, ट्रकने दोघांना चिरडले

By : Shankar Tadas 

कोरपना : तालुक्यातील सोनुर्लीजवळ झालेल्या भीषण अपघातात  महिला व पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. गडचांदूर कडून कोरपनाकडे येणाऱ्या दुचाकीने हायवाला समोरासमोर धडक दिल्याने बुधवार, सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली.
एम एच ३४ बी एस ००८४ क्रमांकाच्या एचएफ डीलक्स दुचाकीने डबल सीट गडचांदूर कडून कोरपना कडे परत येत असताना समोरून येणाऱ्या हायवा क्रमांक एम एच ३४ एबी ११७३
ला समोरासमोर जोरदार धडकला. यात दुचाकी ट्रकमध्ये अडकून दूरवर फरफटत गेली. यात  समीर मडावी रा. खडकी,  प्रियंका झित्रू कुलसंगे (30) रा. धानोली या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी उसळली होती.
सदर घटना कळताच कोरपना पोलिसांनी मार्गावरील गर्दी नियंत्रणात आणली. सात वाजता मृतदेह ट्रॅक्टरमध्ये टाकून कोरपना येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.
मागील काही दिवसापासून राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *