चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार प्रतिभाताई धानोरकर

By : Pandit Londhe 

निवडणूक विशेष 

वरोरा :

सामान्य जि.प.शिक्षकाच्या परिवारात जन्मलेले बाळुभाऊ नारायणराव धानोरकर. शुन्यातुन राजकीय अस्तित्व उभे करीत वयाच्या विसीत राजकीय प्रवासाला महत्वाकांक्षी सुरवात करीत बाळुभाऊ धानोरकर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेतून ७५ वरोरा विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेवर निवडणूक लढविली.त्यात त्यांनी प्रतिभाताईंच्या दारादारापर्यंत मतदाराशी केलेला संपर्क आणि दिलेला विश्वास यातून ग्रामीण मतदारापर्यंत पकड निर्माण करण्यात बाळुभाऊ याःंना यश आले.त्या विजयात प्रतिभाताईंची भुमीका अतिशय मोलाची ठरली.सबंध मतदार क्षेत्रात महिला मतदारावर पाडलेली छाप विजयात रुपांतरीत झाली.

♦️ *मा.बाळुभाऊंची दिल्ली वारी-*

सन २०१९ मध्ये स्व बाळुभाऊंनी तत्कालीन खासदारांना आव्हाण उभे करुन शिवसेनेचा आमदार पदाचा राजीनामा देत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला,पण त्यांच्या उमेदवारीसाठी झालेला संघर्ष हाच विजयाची पायरी ठरला नंतर त्यांनी मिळविलेली उमेदवारी व मोदी लाटेत विद्यमान खासदारांचा केलेला पराभव व त्यांचा विजय महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार म्हणून झालेला अद्वितीय विजय अनेक राजकीय विश्लेशकांना भुरळ पाडणारा ठरला. या विजयाने धानोरकरांचा परिचय राज्य राष्ट्रीय पातळीवर आपोआपच झाला.राष्ट्रीय स्तरावर एक दमदार खासदार म्हणून पक्षश्रेष्ठीसमोर वेगळी छबी व महत्व निर्माण करणारा ठरला.त्यातही प्रतिभाताईंच्या प्रतिभेची परीक्षा ही ठरलीच होती. यातही त्या पास झाल्या.त्यांनी घेतलेली मेहनत अद्वितीयच होती.बाळुभाऊंच्या अद्वितिय विजयात त्या विजयाच्या शिलेदार म्हणून प्रतिभाताईकडे बघण्यात येत होते.ते जाहीरपणे बाळुभाऊंनी कबुल केले.आपली प्रतिभा ही प्रतिभाताईनी त्या विजयाच्या रुपातून दाखविली.बाळुभाऊ महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार झाले.

♦️ *प्रतिभाताई सामान्य गृहिणी ते वरोरा विधानसभा प्रथम महिला आमदार*

स्व.बाळुभाऊंनी आपल्या विजयानंतर लगेच सहा महिण्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घोषीत झाली व वरोरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळेल यावर चर्चा सुरु असतांना बाळुभाऊंनी जबरदस्त लाँबींग करुन आपल्या पत्नी प्रतिभाताईंना उमेदावारी मिळविण्यात यश आणले व ते आव्हाण स्विकारले.बरीच टिका झाली ,घराणेशाही चा मुद्दा घेऊन विरोधक सक्रीय झाले.पक्षांतर्गत विरोधकांनी कंबर कसली पण मुसद्देगीरी व काटेकोर नियोजन,कार्यकर्त्यांची फळी यावर असलेली जबरदस्त पकड कायम ठेवीत तेथेही प्रतिभाताईंचा विजय निश्चित केला.व सन २०१९ मध्ये प्रतिभाताई चंद्रपूर जिल्ह्यातील प्रथम महिला आमदार म्हणुन इतिहास रचण्यात यशस्वी झाल्या.आमदार खासदार एकाच घरात असलेले जोडपे सबंध महाराष्ट्रात चर्चेचा मुद्दा झाला पण स्व.बाळुभाऊंच्या महत्वाकांक्षी अभियानात त्या सक्षमतेने नेतृत्व करण्यासाठी सिद्ध केल्या.स्वतंत्रपणे आपले आमदार पदाचा कार्यभार करावा यात कोणताही हस्तक्षेप न करता त्यांना सक्षम बनविण्यासाठी तयार केले.प्रतिभाताईंनी आपल्या कार्यकालात सामान्य जनतेपर्यंत पोहोचत आपली लोकनेता म्हणुन आपली स्वतंत्र छबी तयार केली.कार्यकर्ता जोडून ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या.आपला लोकोपभिमुख कार्यात त्या यशस्वी होत होत्या . मतदान क्षेत्रावर चांगली पकड निर्माण करण्यात यशस्वी झाल्या.आजवर त्या विद्यमान आमदार म्हणून वरोरा क्षेत्रात कार्यरत आहेत.

♦️ *खा.बाळुभाऊंच्या आकस्मिक निधनाने प्रतिभाताईंच्या प्रतिभेची परीक्षा सुरु.*

मा.बाळुभाऊ धानोरकर चार वर्ष खासदार राहुन कायमची एकाएकी एक्झिट अतिशय वेदनादायी तर ठरली पण राजकीय समिकरणे बलविणारी ठरतील असे वाटले.त्याच काळात सक्षमपणे ती जबाबदारी प्रतिभाताईंनी स्विकारली.प्रामाणिक जुळलेला कार्यकर्ता व जनता पोरकी होणार नाही याची काळजी प्रतिभाताईंनी घेतली.आपल्यावर पती निधनाचे फार मोठे दुःख झुगारुन जनतेच्या भावनेला योग्य साद देत त्या लवकरच पुढे आल्या.विकासकामाचा धडाका लावीत आपण चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा मतदार क्षेत्राचा संपर्क वाढवून कार्यकर्ता जुळविला.जनतेशी प्रत्यक्ष संपर्क करुन सारा मतदार क्षेत्र पिंजून काढला.फार मोठी मेहनत त्यांनी घेतली.पोटनिवडणूक होतील असे वाटले पण ती झाली नाही. एक वर्षानंतर लोकसभेची सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या.लोकसभा क्षेत्रातील उमेदवार म्हणून स्वतः घोषीत केली पण काँग्रेस पक्षातील पक्षातंर्गत राजकीय गटबाजीमुळे तिकिट मिळविण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला.अनेक बड्या दिग्गजांच्या भेटी घेत दिल्लीत तळ ठोकला व शेवटी १५ दिवसांच्या संघर्षानंतर पक्षश्रेष्ठींनी मा. प्रतिभाताईंना खासदारकीची तिकीट बहाल केली.एकच जल्लोष व आनंद मतदार क्षेत्रात झाला.

*विरोधक मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभाताई थेट लढत-*

आमदार प्रतिभाताईचे विरोधक १३-चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभेसाठी म्हणून बल्हारपूर क्षेत्राचे विद्यमान आमदार व विद्यमान आमदार, चंद्रपुरचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे वनमंत्री सन्मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार या दिग्गजांना भाजपाने माजी खासदार अहिरांची तिकिट कापत उमेदवारी दिली. “जीतना संघर्ष बढा उतनी जीत बढी” या ब्रिदावर शेवटपर्यंत लढा देत प्रतिभाताईंनी अतिशय संयमाने प्रचार करत मा.सुधीर मुनगंटीवारांचे आव्हाण पेलविले. मा.सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचाराला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा झाली,अनेक मोठ्ठे दिग्गज मुनगंटीवारांच्या प्रचाराला उतरले.प्रतिभाताई मात्र जनतेच्या ह्दयात स्थान निर्माण करीत सावकाशतेने समर्थन मिळवित होत्या.जनतेच्या हृदयात जागा मिळविली.जनतेने ही निवडणूक हाती घेऊन मोदी सरकारचा पराभव करण्याच्या शपथा घेतल्या.निवडणूक झाली .गावागावातून प्रचंड प्रतिसाद प्रतिभाताईंना मिळू लागला.मतदानरुपी आशीर्वाद मिळावा हाच प्रामाणिक प्रयत्न,भपकेबाजी न करता त्यांनी सातत्याने प्रचार केला निवडणुक अतिशय चुरशीची होईल असे वाटत असतांना निकाल अद्वितीय कल्पनातीत लागला.जनतेने भरभरुन प्रतिसाद देत व त्या दि.४ जुन २०२४ ला भारतीय लोकसभा निवडणूकीच्या निकालात महाराष्ट्रातील प्रमुख लढतीत अव्वल ठरत तब्बल दोन लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून आल्या. *”चंद्रपूर जिल्ह्यातील प्रथम महिला आमदार ते पहिल्या महिला खासदार”* म्हणून इतिहास घडवित विक्रमी विजयी झाल्या.

सन्मा.खासदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर, आपले मनापासून अभिनंदन.आपण लोकोपयोगी कार्यात लोकाभिमुख व्हावे या अपेक्षेसह त्यांना पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा !!

✍🏻 पंडीत लोंढे
वरोरा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *