राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल मतदारांचे आभार – ना. सुधीर मुनगंटीवार* *⭕मतदानासाठी नागरिकांमध्‍ये दिसला प्रचंड उत्‍साह*

 

लोकदर्शन चंद्रपूर 👉 शिवाजी सेलोकर

*चंद्रपूर, दि.१९ एप्रिल – लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज (दि. १९ एप्रिल) मतदान प्रक्रियेत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील मतदारांनी प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवला. विशेषतः नवमतदारांनी अतिशय उत्साहाने मतदान केले. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानतो, अशा भावना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.*

‘निकालाची चिंता न करता गोरगरिबांच्या कल्याणासाठी आजपर्यंत निवडणूक लढविली. या निवडणुकीमध्ये विकासाचा संकल्प घेऊन जनतेशी संवाद साधला. प्रचारादरम्यान, जनतेने भरभरून आशीर्वाद दिले. आज कडक उन्हात जिवाची लाहीलाही होत असताना मतदारांनी केंद्रावर रांगा लावल्‍या. राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्यासाठी लोकशाहीच्‍या या उत्‍सवात उत्‍स्फूर्तपणे सहभाग घेतला, त्याबद्दल जनतेला मी धन्‍यवाद देतो,’ अशी प्रतिक्रिया ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

निवडणुकीतील विजय आणि पराजयाच्या पलीकडे जाऊन भाजपाने कायम जनतेनी सेवा केली आहे व यापुढेही ही जनसेवा आम्‍ही निरंतर करत राहू. भाजपा-महायुतीच्‍या माध्‍यमातून हा सेवायज्ञ आम्ही असाच पुढे नेणार आहे, असेही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *