Home
Home चंद्रपूर महाराष्ट्रः गोंड समुदाय ग्रंथ प्रकाशित

महाराष्ट्रः गोंड समुदाय ग्रंथ प्रकाशित

By : Shankar Tadas

चंद्रपूर :

भारतातील आदिवासी जमातींपैकी संख्येने सर्वांत मोठ्या जमातींपैकी एक अशी ही गोंड जमात आहे. थेट ओरिसापासून मध्यप्रदेश, छत्तिसगढ, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश पर्यंत ती पसरली असून गोंडांनी व्याप्त प्रदेशाला ‘गोंडवाना’ हे नाव प्रचलित आहे. महाराष्ट्रात, विदर्भ विभागात प्रामुख्याने गोंडांची वस्ती असून विदर्भातल्या गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि अल्प प्रमाणात नांदेड, तसेच अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये गोंडांची वस्ती पाहावयास मिळते तर गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळात त्यांची दाट वस्ती आहे.

या ठिकाणी महाराष्ट्र : गोंड समुदाय हा ग्रंथ प्रकाशित करताना मनस्वी आनंद होत आहे कारण महाराष्ट्रातील

चंद्रपूर व अन्य अनेक जिल्ह्यात या एका शुर वंशजांचे वास्तव्य, राज्य कारभाराच्या ऐतिहासिक पाऊल खुणा पहावयास मिळतात तसेच यांचे वेगळेपण देखील अनुभवायास मिळते. या ग्रंथात त्यांच्या सामाजिक संरचनेच्या विविध पैलुवर प्रकाश टाकून महत्व अधोरेखित करण्याचा एक स्तुत्य प्रयत्न केला आहे. मानववंशशास्त्राचा कांहीसा आधार घेऊन तद्वंतर सामाजिक स्थिती, धार्मिक जीवन, परंपरा, चालीरीती तसेच सांस्कृतिक पैलु, राजघराण्याचा इतिहास उलगडण्यात आला आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्याशिवाय अन्य राज्यात देखील यांचे ऐतिहासिक वास्तव्य याचाही परिचय करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मला निश्चित खात्री आहे की हा ग्रंथ वाचकांना आवडेल. सदर ग्रंथाचे लेखन अत्यंत अल्पावधित डॉ. शाम कोरेटी, प्रमुख, इतिहास विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांनी केले असुन

मानववंशशास्त्रा आधारे काही लेखन श्रीमती आरती नवाथे, पुणे यांनी केले आहे. तर तज्ज्ञ तपासणी डॉ. एस.

जी. देवगांवकर व डॉ. शैलजा देवगांवकर यांनी केली आहे.

गोंड – मानववंशीयशास्त्र अभ्यास, गोंडांची सामाजिक स्थिती, गोंडांचे धार्मिक जीवन, गोंडांचे सांस्कृतिक पैलू, मध्य प्रदेशच्या इतिहासातील गोंड, गोंड कालीन किल्ले, परिशिष्ट, छायाचित्रे

असे सर्व देऊन हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here