लायन्स क्लब सावर्डे आणि चिरायु हॉस्पिटल सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न. .. !*

 

लोकदर्शन सावर्डे 👉-गुरुनाथ तिरपणकर

सावर्डे येथील चिरायु हॉस्पिटल च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त लायन्स क्लब सावर्डे च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले सदर शिबिरामध्ये मुळव्याधी आजारासंबंधातले आणि मासिक पाळी आजारासंबंधातले विविध एकूण 26 रुग्ण तपासून त्यांना मोफत उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिरास ला डॉक्टर निलेश पाटील आणि डॉक्टर रश्मी पाटील यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली, त्याचबरोबर चिरायु हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरास लायन्स क्लबचे ला MJF संजय कोकाटे, ला सिताराम कदम, ला विनय कदम, सचिव ला सतीश सावर्डेकर, ला डॉ कृष्णकांत पाटील, ला डॉ दर्शना पाटील, ला डॉ वर्षां खानविलकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here