फुले एज्युकेशन तर्फे उद्या होणार निढळ येथे गोरे आणि शेवते यांचा मोफत सत्यशोधक विवाह* !!!

  • लोकदर्शन 👉 राहुल खरात

पुणे- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फ सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व जेष्ठ विचारवंत सत्यशोधक प्रा.हरी नरके यांचे स्मृतीप्रित्यर्थ उद्या मंगळवार दि.22 ऑगस्ट 2023 रोजी दू.3 वाजता
सत्यशोधिका कोमल उमेश शेवते, सातारा आणि सत्यशोधक किशोर सुधीर गोरे , कटगुण यांचा 46 वा मोफत सत्यशोधक विवाह सौभाग्य मंगल कार्यालय, निढळ,सातारा येथे होणार आहे.
हा विवाह महात्मा फुले याना अभिप्रेत असलेल्या पददतीने अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक रजिस्टर नोंदणी करून लावणार असून महात्मा फुले रचित मंगलाष्टके चे गायन प्रा. सुदाम धाडगे आणि हनुमंत टिळेकर करणार आहेत.
यावेळी वधू वर यांना फुले एज्युकेशन तर्फे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम आणि सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र अध्यक्ष ढोक यांचे शुभहस्ते दिले जाणार आहे.तर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आईवडील ,मामा मामी यांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करणार आहोत. यावेळी अक्षता म्हणून फुलांचा वापर करणार असून मान्यवर यांना फुले दाम्पत्य यांचे ग्रंथ भेट दिले जाणार आहे. या विवाहाचे आयोजन कटगुण चे प्रा.सुधीर गोरे,समाजसेवक (वराचे वडील) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here