लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देऊळगांव राजा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष जाधव यांना स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी समाधान शिंगणे युवा प्रतिष्ठान देऊळगांव मही यांच्या वतीने छत्रपती गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशसेवा, शैक्षणिक, आरोग्य, पोलीस, पत्रकार,कलावंत, क्रीडा, लघुउद्योग, उद्योग या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना छत्रपती गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात गतकाही वर्षांपासून आपल्या लेखणीच्या माध्यमातून विविध समस्यांना वाचा फोडून समाजातील वंचित शोषितांना न्याय देण्याची भूमिका लिखाणातून मांडणारे पत्रकार संतोष जाधव यांना सरपंच सौं. वंदनाताई भगवान शिंगणे, छत्रपती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा सभापती समाधान शिंगणे ,सामाजिक कार्यकर्ते सुनिल मोरे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या भव्य प्रांगणात छत्रपती गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबाबत संतोष जाधव यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
Home Breaking News छत्रपती गुणगौरव पुरस्काराने पत्रकार संतोष जाधव सन्मानित ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,