घुगुस काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटेंचा सत्कार.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

चंद्रपूर :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचा घुगुस काँगेस च्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी घुगुस येथे सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी घुगुस काँग्रेस कार्यकर्त्यांची राजु रेड्डी यांचे नेतृत्वात त्यांचे जंगी स्वागत करून सत्कार केला. या प्रसंगी आ. धोटे यांनी घुगुस काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चे बांधणी करून जनहिताच्या कार्यासाठी व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी शामराव बोबडे, मुन्ना लोहानी, सुधाकर भांदुरकर, अन्वर सैय्यद, अलीम शेख, रोशन दंतलवार, रोहित डाकूर, गुड्डू मदार, आकाश चिल्का, अनुप भंडारी, रफिक शेख, अरविंद चांडे, सुनील पाटील, कपिल गोगुला, देव भंडारी, मोसीम शेख, शैजाद शेख, अनिरुद्ध आवडे यासह घुगुस काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here