इन्फंट कॉन्व्हेंट येथे शिक्षक- पालक संघाची स्थापना

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल, राजुरा येथे शाळेचे शिक्षक आणि पालक यांची सहविचार सभा घेऊन शिक्षक -पालक संघांची स्थापना करण्यात आली. यात शिक्षक- पालक संघाने परस्पर संवाद कायम ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करण्याचा संकल्प घेण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अभिजीत धोटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक पालक संघाचे सीबीएसई शाखेच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, स्टेट शाखेच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, पालक वर्गातून उपाध्यक्ष बादल बेले, नंदकिशोर वाढई, सचिव संतोष सागर, धरती नक्षीने, सहसचिव शैलेंद्र तेलंग, सुभाष कोरवते यांनी स्थान भूषवले. या सभेला सीबीएसई शाखेतील विद्यार्थी प्रतिनिधी तनुष गोणेलवार, कुमारी सृष्टी खोके तर स्टेट शाखेतील विद्यार्थी प्रतिनिधी सम्यक फुलझेले, कुमारी इशिका राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सागर यांनी केले, सूत्रसंचालन ममता पुरटकर यांनी तर आभार प्रदर्शन मजहर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here