कराटे प्रशिक्षणातून युवकांमध्ये विविध क्षमतांचा विकास होण्यास मदत : आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

ओपन इंटरस्टेट कराटे चॅम्पियनशिप चे आ. धोटेंच्या हस्ते उद्घाटन.

राजुरा (ता. प्र) :– ओकिनावा मार्शल आर्ट अकाडमी आणि उत्साही स्कुल आॅफ कराटे राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र हाल राजुरा येथे ओपन इंटरस्टेट कराटे चॅम्पियनशिप २०२३ चे आयोजन करण्यात आले. या आंतर राज्य कराटे स्पर्धे चे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, कराटे प्रशिक्षणातून युवकांमध्ये आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम घेण्याची वृत्ती यासह विविध क्षमता विकसित होण्यास मदत होते. त्यामुळे आत्मसंरक्षणाबरोबरच अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्याची मानसिकता वाढिस लागते. पुर्वी धनुर्विद्या तलवार प्रशिक्षण महत्त्वाचे असायचे आजच्या काळात मार्शल आर्ट, कराटे हे तितकेच महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी, युवकांनी या प्रकरचे प्रशिक्षण घेऊन कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन व कौतुकही केले.
या प्रसंगी ओकिनावा मार्शल आर्ट अकाडमी चे संचालक मयुर खेरकर, उत्साही स्कुल आॅफ कराटे, राजुरा चे संचालक प्रविण मंगरुळकर, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, वाघु वजी गेडाम, समीर चील्लावार, सचिन बैस, शुक्ला सर, प्रकाश पचारे, भटपल्लीवार, जयपूरकर, कुरुमदास पावडे, मसरामजी, अंबुजा फाऊंडेशन च्या सरोज मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मयुर खेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश पचारे यांनी केले. कार्यक्रमाला कराटे प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, स्पर्धक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here