आत्मनिर्भर भारत नेईल देशाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर* *- ♦️सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार* *♦️महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धा*

लोकदर्शन 👉.शिवाजी सेलोकर

*चंद्रपूर, दि. १२* : विदर्भातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर इथल्या तरुणांनी आपली वैचारिक क्षमता सिद्ध केली आहे. अशाच तरुणांच्या जोरावर आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून देश प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणार आहे, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. २०४७ साली १५ ऑगस्टचा तिरंगा भारताच्या आकाशात उंच फडकेल, तेव्हा संपूर्ण जग तिरंग्याला सलाम करेल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

प्रियदर्शनी सभागृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आत्मनिर्भर भारत विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे नेते रामपाल सिंग, भाजपा आत्मनिर्भर भारत आघाडीच्या जिल्हाध्यक्ष किरणताई बुटले, भाजपा चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजपाचे नेते नामदेव डाहुले, स्पर्धेचे परीक्षक भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, बिपीन गुप्ता, प्रशांत ठाकरे, एसएनडीटीचे संचालक डॉ. इंगोले, आत्मनिर्भर भारतचे महामंत्री राकेश बोमनवार, रणजित डवरे, उपाध्यक्ष हिना खान, सदस्य रंजना जेगटे, लीलावती रविदास, प्रभाताई गुडदे, विठ्ठलराव डुकरे, चांदभाई, सचिन कोतपल्लीवार, राकेश गौरकार, आयोजनात विशेष परिश्रम घेणारे सोहम बुटले आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांची कल्पकता व त्यांच्या विचारांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती देऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘परिसंवादांच्या माध्यमातून विचार मांडण्याची ‌व विचार व्यक्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील विश्वास दृढ होण्यास निश्चितच मदत होईल. फिल्मसिटीसारखे व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात आले आहे हे कौतुकास्पद आहे.’ पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘स्पर्धेमध्ये समान नागरी कायद्यावर विचार मांडण्यात आले आणि चर्चाही करण्यात आली.देशामध्ये धर्म, जात, रंग, वंश, वय व शिक्षण यामध्ये विविधता आहे. मात्र, नागरिकांच्या हृदयामध्ये संविधानाचा भाव आणि भावना असणे आवश्यक आहे. त्यासोबतच भारत हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वात मोठा भाग व्हावा असा निर्धार देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ही समाजामध्ये सहजता, सरलता व सुलभता निर्माण करेल. त्यामुळे ‘हम साथ साथ है’ या भावनेने समाज निश्चितच पुढे जाईल.’ या स्पर्धेत विदर्भाच्या विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

*ज्ञानातून साधावे समाजहित*
‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’ याप्रमाणे महाराष्ट्राच्या विदर्भातील नागरीकांचे योगदान सोनेरी अक्षरात लिहिले जाईल. विद्यार्थ्यांनी विविध विषयावर विचार मांडले. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता व वैचारिक क्षमतेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी न करता इतरांसाठी व समाजासाठी करावा. या ज्ञानातून समाज हितासाठी योगदान देण्याची भावना ठेवावी, असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *