विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम*

 

लोकदर्शम मुंबई 👉शुभम पेडामकर

लोहमार्ग पोलीस, मुंबई आणि
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती एम्.डुंगरसी महाविद्यालय
(समाजकार्य पदविका अभ्यासक्रम बॅच)
यांच्या संयुक्त विद्यमाने “रेल्वे सुरक्षा…
आपली सर्वांची जबाबदारी” अभियान २०२३ अंतर्गत दादर रेल्वे स्टेशन येथे पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. तसेच महिला सुरक्षेसाठी मुंबई लोहमार्ग पोलीस यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेले ‘खाकीतील सखी ‘ या महिलांच्या सुरक्षेविषयी अभियानाची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभागी होऊन सादरीकरण केले. कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. डी. व्ही. पवार, विभागप्रमुख , डॉ.विठ्ठल सोनटक्के, डॉ.घुमरे मॅडम तसेच प्रा.रोहन राजापकर यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.

दादर लोहमार्ग पोलीस, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीम.स्मिता ढाकणे आणि त्यांच्या सर्व टीमने हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. लोहमार्ग पोलीस,सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री.गावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

रेल्वे सुरक्षा आणि माध्यमाचा सकारात्मक वापर या विषयावर श्रीम.तृप्ती राणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व विथ श्रद्धा या संस्थेच्या संस्थापिका श्रीम.श्रद्धा सिंग यांनी त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

सर्व उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

शुभम पेडामकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here